पेट्रोल पंपांनी जास्त पैसे घेणे किंवा कमी पेट्रोल आणि डिझेल देणे आता नुकसानीचे होऊ शकते. ग्राहकाने ग्राहक मंचामध्ये तक्रार केल्यास पेट्रोल पंपचा परवाना कायमचा रद्द केला जाऊ शकतो. ग्राहकांना तक्रारीवरून जिल्हा पुरवठा विभागाने पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर काही दिवस बंदी घातली किंवा नाममात्र दंड आकारला,आता पेट्रोलियम व नैसर्गिक वायु मंत्रालयाने तेल कंपन्यांना याबाबत कडक सूचना जारी केल्या आहेत.
◆ अशा प्रकारे पेट्रोल पंप परवाना रद्द करता येईल :-
पेट्रोल पंपावर मशिनमध्ये चिप टाकून पेट्रोल,डिझेल कमी करण्याच्या प्रकरणात सरकारने गेल्या वर्षी कठोर पावले उचलली होती. देशातील पेट्रोल पंपावर चिप लावून पेट्रोल,डिझेल चोरी करणे पंप मालकांना भारी पडणार आहे. मागील वर्षी 20 जुलै रोजी नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू झाल्यानंतर आता पेट्रोल पंप चालकांवर कडक कारवाई सुरू झाली आहे. कमी पेट्रोल आणि डिझेलमुळे ग्राहक वैतागले आहेत, परंतु आता पेट्रोल पंप ऑपरेटर हे नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत ग्राहकाची फसवणूक करू शकत नाहीत. ग्राहकाने तक्रार केल्यास पेट्रोल पंपावर दंडासह त्याचा परवाना देखील रद्द होऊ शकतो.
तेल चोरीचा खेळ शहरातून खेड्यापाड्यात पसरला आहे.
देशातील तेल चोरीचा खेळ छोट्या शहरातून मोठ्या शहरात आणि खेड्यामध्ये पसरला आहे. पेट्रोल पंपवाले अनेक प्रकारे ग्राहकाची फसवणूक करत आहेत. ग्राहक फिक्स रुपये जसे 100 ,500 आणि 2000 हजार रुपयांचे तेल द्यायला सांगतात.मात्र ग्राहकांना हे ठाऊक नसते की,या फिक्स रुपयांवर बोलताना आधीपासून चिप करून पेट्रोल पंप ऑपरेटर कडून लीटर कमी केले जाते. याद्यावरे ग्राहकांची फसवणूक होते.
"अनेक पंप चालक आता योग्य माप ठेऊन ग्राहकांना उत्तम सेवा देत आहेत. कंपन्याही पेट्रोल पंपांवर कडक लक्ष ठेऊन आहेत. वेळोवेळी तपासण्या होत आहेत. अगोदर पेक्षा ग्राहकांना फसविण्याचे प्रकार खूप कमी झाले आहेत" - विश्वजीत कुमार, फिल्ड ऑफिसर, इंडियन ऑइल, बीड