प्रवीण पोकळे
आष्टी दि. १९ : राजकारणात जनतेसोबत असलेला सामरिक किंवा कनेक्ट नेहमीच महत्वाचा असतो, आणि त्यामुळेच राजकीय नेते जनतेत मिसळण्याची एकही संधी कधी सोडत नाहीत . सुरेश धस तर त्यातल्या त्यात कायम जनतेत मिसळणारे म्हणूनच परिचित. कधी गळ्यात ढोल अडकवून ते ढोल वाजविताना दिसतात , कधी गुरांच्या छावण्यांवर मुक्काम ठोकतात तर कधी बिबट्याचा शोध घ्यायला हातात बॅटरी घेऊन निघतात. त्याच सुरेश धस यांचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. भीड आहे गणेश विसर्जन मिरवणुकीतला , 'मै हू डॉन ' गाण्यावर सुरेश धस यांच्या डान्सचा. आतापर्यंत १० लाखांपेक्षा अधिक दर्शकानी हा व्हिडीओ लाईक केलाय .
मंगळवारी दिवसभर धस यांनी आष्टी सह मतदार संघातील विविध गणेश मंडळांना भेटी देत विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदविला.आष्टी शहरातील मानाच्या गणरायाची विसर्जन मिरवणुका दुपारपासूनच सुरू होत्या.ढोल ताशांचा गजर,पारंपारिक वाद्ये यासह डीजेच्या तालावर मंडळाचे युवक कार्यकर्ते यांच्यासोबत माजी मंत्री सुरेश धस यांनी देखील वाद्यांच्या तालावर ठेका धरत मै हु डॉन,आया है राजा लोगो रे लोगो यासह अन्य गीतांवर ठेका धरला.तरुणांनी अक्षरशः धस यांना डोक्यावर घेतले होते.धस यांनी देखील त्यांच्या आनंदात सहभागी होऊन मंडळांच्या कार्यकर्त्यांची मने जिंकली.उपस्थितांनी त्यांच्या या डान्सचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकल्यानंतर ते 10 लाखांहून अधिक लोकांना आवडले आणि ते इतरांना शेअर केले.त्यामुळे नेहमीच या ना त्या कारणाने राजकीय क्षेत्रात चर्चेत असलेल्या धस यांनी आपल्यातील वेगळेपणा पुन्हा एकदा सिद्ध केला.
बातमी शेअर करा