आष्टी-तालुक्यातील सुरुडी परिसरातील शेतामध्ये काम करीत असताना आष्टी पंचायत समितीचे सदस्य पती नागनाथ गहिनीनाथ गर्जे यांच्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार मारले होते.घरातील कर्ता पुरुष या हल्ल्यात ठार झाल्याने अख्ख कुटुंब उघडण्यावर आले होते.आ.सुरेश धस यांनी याची गांभीर्याने दखल घेत गर्जे कुटुंबियांना पाच लाखांची आर्थिक मदत केली. रविवारी (दि.१७) मदतीचा धनादेश आशा गर्जे,गहिनीनाथ गर्जे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. दरम्यान आ.धस यांनी नागनाथ गर्जे यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते.ते रविवारी त्यांनी पूर्ण केले असून यावेळी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, सभापती बद्रीनाथ जगताप,उपसभापती रमेश तांदळे,रंगनाथ धोंडे,यशवंत खंडागळे,रावसाहेब लोखंडे,अशोक मुळे,भारत मुरकुटे,जिया बेग,गणेश शिंदे,विनोद रोडे,प्रविण वारे, नवनाथ लोंढे उपस्थित होते.
प्रजापत्र | Sunday, 17/01/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा