परभणी-जिंतूर शहरातील एका सामान्य कुटुंबातील लेक अंजली संपत कोला-पोर्जे ही मिसेस एशिया युनिव्हर्स ठरली आहे. अंजली यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील ब्युटी पिजंट या स्पर्धेत पाचव्या श्रेणीत जगभरातून आलेल्या 60 विवाहित महिलांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ही स्पर्धा राजस्थानमधील जयपूर येथे मिसेस युनिव्हर्स प्रा.लि. तर्फे आयोजित करण्यात आली होती. अंजली यांच्या या यशामुळे परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
अंजली या परभणी जिल्ह्यीतील जिंतूर या छोट्याशा शहरातून आलेल्या आहेत. त्यांना लहानपणापासून फॅशन आणि डिझायनिंगमध्ये आवड होती. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण शहरातील एकलव्य बालविद्या मंदिर विद्यालयातून घेतले. तर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी औरंगाबाद गाठले. या काळात त्यांनी आपला मॉडेलिंग, फॅशनिंगचा छंद जोपासला.
अंजली यांचे 2009 साली औरंगाबदमधील इंलेक्ट्रिकल इंजिनिअर संपत पोर्जे यांच्याशी लग्न झाले. अंजली यांना लहानपणापासूनच फॅशनिगं, मॉडेलिंग आणि डिझायनिंगची आवड असल्यामुळे लग्न झाल्यानंतर त्या हे छंद जोपासू शकतील का?, अशी शंका त्यांच्या मनात येत होती. मात्र, संपत यांनी त्यांची बायको म्हणजेच अंजली यांना प्रोत्साहन देत त्यांच्या स्वप्नांना बळ दिलं. आपल्या नवऱ्याच्या साथीनेच त्या हे यश संपादन करु शकल्या असं त्या सांगतात.
बातमी शेअर करा