अंबाजोगाई-तालुक्यातील कुंबेफळ,सनगाव, डिघोळ आंबासह लोखंडी सावरगाव परिसरातील १०गावे सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली असून अंबाजोगाई तालुक्यातील १२७० कोंबडयाचे कलिंग करण्यात आले आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे कोंबडीचा मृत्यु बर्ड फ्लू झाल्याचे समोर आले आहे.त्या अनुषंगाने सदर क्षेत्रात संसर्ग ग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून संबंधित गावाच्या एक ते दहा किलोमीटर परिसरातील गावांना पुढील आदेशापर्यंत सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असल्याने या गावातील कुकुट पक्ष्यांची खरेदी विक्री वाहतूक बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. शनिवारी दुपारपर्यत १२७० कोंबड्याचे कलिंग पुर्ण झाले असून पोल्ट्री फार्मवरील कर्मचारी यांना क्वाराटाईन केले जात आहे.
बातमी शेअर करा