कोल्हापूर : “मागच्या काळात 9 ते 12 वीपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरक्षित वातावरणात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. त्याचप्रकारे काळजी घेऊन दुसऱ्या टप्प्यात शाळा सुरू होणार. 27 जानेवारीपासून 5 वी ते 8 वी पर्यंत शाळा सुरू होतील. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या मधल्या किंवा शेवटच्या काळात घेण्याचा विचार आहे. आगामी काळात याबाबत ठोस निर्णय होईल”, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
“वाड्या-वस्त्यांवर शाळा पोहचल्या, आता शाळा गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी आवश्यक प्रेझेंटेशन व्हिजन 2025 माध्यमातून मुझ्यामंत्र्यांना दिलंय. मागच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान झालं. भविष्यात त्यांना संकटाला समोर जावं लागू नये, याचा विचार करून शालेय शिक्षण विभाग निर्णय घेईल”, असं त्यांनी सांगितलं.