बीड दि.१६ - जिल्ह्यातील लोखंडीसावरगांव (ता. अंबाजोगाई) येथे कोंबड्यांचे मृत्यु बडे फ्लू रोगाने मृत्यू झालेले आहेत. त्या अनुषंगाने सदर क्षेत्रास संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले असून संबंधीत गावांच्या 1-10 कि.मी. परिसरातोल गावाना पुढील आदेशापर्यंत सतर्क क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी निर्गमित केले आहेत.
श्रीपतरायवाडी, वरपगांव, कोळ कानडी, डिघोळअंबा, कोद्री ,सातेफळ, हिवराखुर्द, चनई, कुंबेफळ, माकेगांव उमराई सनगांव तसेच केज तालुक्यातील होळ, दिपेवडगांव, पळसखेडा, बोरोसावरगांव व कानडी बदन ता.अंबाजोगाई या गावांना पुढील आदेशापर्यत सतर्कक्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे.
सदरील गावांतील कुक्कुट पक्षांचीं खरेदी, विकी, वाहतूक, बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. तसेच या बाबीसाठी वरील सर्व गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पुढील आदेशापर्यंत घोषित करण्यात आले आहेत. यासंदर्भात सामान्य नागरिकांमध्ये कोंबडीच्या मृत्यू बाबत भितीचे वातावरण निर्माण होवू नये आपल्या भागात किया 2 कावळे मृत पावल्यास घाबरून जावू नये. सदरील मृत कावळे, कोंबड्या आढळून आल्यास ग्रामपंचायत नगरपंचायत यांच्याशी अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच मृत कावळ्यांना उघड्या हाताने स्पर्श करु नये, मास्क वापरावा. तसंच सदरील भाग धुण्याच्या सोड्याने किंवा चुण्याने निजंतूकिकरण करुन घ्यावा. कावळ्यांमध्ये जास्त प्रमाणात असाधारण मृत्यू आढळल्यास रोग निदानासाठी त्यांचे नमुने पाठविण्यात येणार आहेत.