Advertisement

आष्टी तालुक्यात पुन्हा 'इतक्या' पक्षांचा मृत्यु

प्रजापत्र | Friday, 15/01/2021
बातमी शेअर करा

    
आष्टी-जिल्ह्यात कोरोनापेक्षा अधिक बर्ड फ्लूची दहशत निर्माण झाली असून रोज पक्षी,कोंबड्यांचा मृत्यु विविध भागात झाल्याचे समोर येत आहे.शुक्रवारी (दि.१५) आष्टी तालुक्यातील केरूळ गावापासून जवळ असलेल्या खडकळी तलावाच्या काठी १२ पक्षी मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. घटनस्थळी पशुसंर्वधन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. 
        पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे अनेक कावळ्याचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाल्यानंतर आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव येथेही दोन मृत कावळे आढळले होते.  तसेच शिरापुर येथे काही कोंबड्या दगावल्याचे उघडकीस आल्याने बर्ड फ्ल्यूची धास्ती वाढत आहे. आता तालुक्यातील खडकळी तलावाच्या काठी शुक्रवारी १२ पक्षी मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पक्ष्यांचा मृत्यू पक्षी दोन दिवसा पूर्वी झाला असल्याने त्यांचे तपासणीसाठी नमुने घेता आले नाहीत. यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याची माहिती तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांनी दिली आहे.दरम्यान आष्टी तालुक्यात पशुसंर्वधन विभागाने सात पथके तैनात केली असून तालुक्यात पक्षी अथवा कोंबड्यांचा मृत्यु झाला तर याची माहिती कळविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Advertisement

Advertisement