मुंबई-मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर चर्चेत आलेल्या आणि तब्बल तीन व्यक्तींनी हनी ट्रॅपचे आरोप केलेल्या 'त्या' महिलेने आता, 'तुमची इच्छा असेल तर मीच माघार घेते ' अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचे वेळी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेण्याचेही सांगितले आहे. त्यामुळे आता सदर आरोप प्रकरणाला आणखी काय वळण मिळते याकडे सर्वांच्या नजर आहेत.
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ३ दिवसापूर्वी एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यावरून राज्यभरात खळबळ मजल्यानंतर धनंजय मुंडे यांनी सदर महिला ब्लॅकमेल करीत असल्याचे म्हटले होते. धनंजय मुंडे यांच्याकडून हा खुलासा आल्यानंतर एका भाजप आमदारांसह मनसे नेता आणि आणखी एका व्यक्तीने सदर महिलेवर हनीट्रॅपचे आरोप केले होते.
या पार्श्वभूमीवर आता सदर महिलेने 'कसलीच माहिती नसताना माझ्याबद्दल काहीही बोलले जात आहे, तुमची सर्वांची इच्छा असेल तर मीच माघार घेते' असे म्हटले आहे. त्याचवेळी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता सदर महिला काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष आहे. आजच्या पत्रकार परिषदेत सदर महिला काही कागदपत्रे आणि व्हिडीओ दाखविणार का हा देखील प्रश्न आहे. कारण कालच सदर महिलेच्या वकिलाने 'व्हिडीओ क्लिप समोर आल्यावर अनेकांची तोंडे बंद होतील ' असे म्हटले होते.
प्रजापत्र | Friday, 15/01/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा