Advertisement

मतदान केंद्रावरच नियुक्त कर्मचाऱ्यांचे मद्यपान

प्रजापत्र | Friday, 15/01/2021
बातमी शेअर करा
उमेदवार आणि गावकऱ्यांनी रंगेहात पकडले
माजलगाव    तालुक्यातील मोगरा याठिकाणची ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम सुरु असून दि.१५ रोजी मतदान होणार आहे या मतदान केंद्रावर नियुक्त असलेल्या कर्मचारी हे मद्यपान करीत असल्याचे निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवार आणि गावकऱ्यांना लक्षात आल्याने सदरील मतदान केंद्रावर जात कर्मचाऱ्यांना मद्यपान करत असतांना रंगेहात पकडले असून सदरील ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी दाखल झाल्याचे वृत्त लिहेपरेंत समजते.
                              ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा सुरु असून त्यात माजलगाव तालुक्यातील मोगरा गावच्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे दि.१५ रोजी या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यासाठी मतदान केंद्रावर अधिकारी,कर्मचारी यांना प्रशासनाच्या वतीने पाठवण्यात आले आहे त्यानुसार मोगरा येथील मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या एका मतदान केंद्रावर संध्याकाळी नियुक्त कर्मचारी हे मद्यपान करत असल्याचे तेथील उमेदवार आणि काही गावकऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तेथे जात सदरील मद्यपान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले.यातून नियुक्त कर्मचाऱ्यांना खडेबोल सूनवत त्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या परेंत पोहनचवण्यात आली असून निवडणूक निर्णय अधिकारी आता सदर ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहेत.सदरील प्रकरणी व्हिडीओ क्लिप व्हायलर झाली असून सदरील प्रकरणाची चर्चा चांगलीच रंगली आहे.
 
नवीन कर्मचारी नियुक्ती करणार.
मोगरा येथील मतदान केंद्रावर तात्काळ नवीन कर्मचारी नियुक्त करण्यात येतील,सदरील प्रकरणात चौकशी करून कारवाई करण्यात येईल अशी माहिती दूरध्वनी वरून तहसीलदार वैशाली पाटील यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement