दिल्ली-भारतीय बाजारांमध्ये गुरुवारी मकरसंक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारी 2021 यादिवशी सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली. दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरांमध्ये दर 10 ग्रॅममागे 369 रुपये इतकी घसरण नोंदवली गेली. सोबतच चांदीच्या किंमतीतही 390 रुपये प्रती किलोग्रॅमची नाममात्र घसरण झाली.
मागील व्यवसाय सत्रादरम्यानही दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं 48,757 रुपये प्रती 10 ग्रॅमवर येऊन थांबलं होतं. आणि चांदी 64,924 रुपये प्रती किलोग्रॅमवर होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा भाव आज खाली पडला. चांदीची किंमत मात्र जेवढ्यास तेवढी राहिली. दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किमती रुपये 369 प्रती 10 ग्रॅम इतक्या घटल्या. राजधानी दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धता असणाऱ्या सोन्याचा भाव आता 48,388 रुपये प्रती 10 ग्रॅम इतका झाला आहे. याआधीच्या व्यावसायिक सत्रादरम्यान सोन्याचा भाव 48,757 रुपये प्रती 10 ग्रॅमवर येऊन थांबला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव आता कमी होऊन 1,842 डॉलर्सवर प्रती औंसवर पोचला आहे.