Advertisement

लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार?

प्रजापत्र | Tuesday, 06/08/2024
बातमी शेअर करा

महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे या योजनेमुळे राज्य कर्जबाजारी होईल अशी टीका मविआच्या नेत्यांनी केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.मुंबई हायकोर्टाने यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. या योजनेला वित्त विभाग देखील विरोध करतअसल्याच्या चर्चा देखील सुरु झाल्या होत्या. मात्र आता अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांना राज्य सरकार प्रति महिना १५०० रुपयांचा हप्ता देणार आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक भार पडेल अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. अशातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांनी सरकारवर केलेल्या हल्ल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार पलटवार केला आहे. चालू आर्थिक वर्षात या योजनेसाठी लागणाऱ्या ३५००० कोटी रुपयांची संपूर्ण तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते. त्यानंतर आता अजित पवार यांनी योजनेची रक्कम वाढवण्याचे संकेत दिले आहेत.

Advertisement

Advertisement