पॅरिस : महाराष्ट्राचा सुपूत्र अविनाश साबळे आता भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे. कारण अविनाशने अॅथलेटीक्समधील ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात फायनल गाठली आहे. त्यामुळे आता भारताच्या मेडलचा रंग बदलण्याची आशा निर्माण झाली आहे.
या प्रकारत दोन विभाग असतात. या दोन्ही विभागात जे खेळाडू अव्वल पाच खेळाडूंमध्ये असतात त्यांना फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळवते. अविनाश ह दुसऱ्या गटात होता. या स्पर्धेत सुरुवातीला अविनाशने चांगली आघाडी घेतली होती आणि तो दुसऱ्या स्थानावर होता. पण थोड्याच वेळात त्याने ही आघाडी गमावली. त्यामुळे अविनाश फायॉनलमध्ये पोहोचणार की नाही, अशी चर्चा सुरु झाली होती. पण अविनाशने त्यानंतर आपल्या स्थानाची घसरण होऊ दिली नाही. अविनाशने पाचवे स्थान पटकावले आणि
भारताला अविनाश साबळेकडून फार मोठ्या आशा होत्या. गेल्या वेळीही त्याने चांगली कामगिरी केली होती. पण त्याला पदक मिळवता आले नव्हते. त्यामुळे त्याला यावेळी पदक मिळवता येते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. कारण महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळेने या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले. त्यानंतर सर्वांच्या नजरा या अविनाशवर होत्या. सोमवारी झालेल्या प्राथमिक फेरीत अविनाश कशी कामगिरी करतो, यावर सर्वांचे लक्ष लागलेले होते.