Advertisement

मच्छिंद्रनाथ गडावरून १ लाख २० हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी 

प्रजापत्र | Monday, 05/08/2024
बातमी शेअर करा

आष्टी दि.०५ (प्रतिनिधी)- येथील मच्छिंद्रनाथ गड मायंबा सावरगाव येथे (दि. ४) सोमवार रोजी ज्ञानदेव दत्तात्रय औटी हे देवदर्शनासाठी गेले असता त्यांच्याकडील १ लाख २० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अंभोरा पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 पुणे जिल्ह्यातील दिघी येथील रहिवासी असलेले ज्ञानदेव दत्तात्रय औटी हे देवदर्शनासाठी मच्छिंद्रनाथ गड मायंबा सावरगाव येथे गेले असता गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने चोरून नेली. २५ ग्रॅम वजनाची ७५ हजार रुपये मूल्य असलेली सोन्याची चैन, १५ ग्रॅम वजनाची ४५ हजार रुपये मूल्य असलेली सोन्याची चैन असा एकूण १ लाख २० हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन चैन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी अंभोरा पोलीस ठाणे येथे धाव घेऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार पालवे करीत आहे.

Advertisement

Advertisement