प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्यावर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. तिचं आयएएस पद तात्पुरतं रद्द करण्यात आलंय.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा- २०२२ च्या माध्यमातून तात्पुरती शिफारस केलेली उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची उमेदवारी तात्पुरती रद्द केली आहे. शिवाय तिला भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीतून कायमचे बाद करण्यात आलेले आहे.
पूजा खेडकर हिच्यावर आजवरची ही सर्वात मोठी कारवाई समजली जातेय. सुरुवातीला पूजाची पुण्यातून वाशिम येथे बदली झाली होती. त्यानंतर प्रशिक्षण संस्थेने तिचं ट्रेनिंग थांबवलं होतं. पुढे यूपीएससीने तिच्यावर नाव बदलून परीक्षा दिल्याच्या प्रकरणात गुन्हा नोंद केला होता. आता यूपीएससीने तिचं आयएएस पद रद्द ठरवलं असून भविष्यातील कोणतीही परीक्षा तिला देता येणार नाहीये.
बातमी शेअर करा