दिल्ली -:भारताची नेमबाज मनू भाकरने आज (दि.२८) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला. 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात तिने कांस्य पदक मिळवले. ऑलिम्पिकमध्ये पदक पटकविणारी ती देशाची पहिली नेमबाज ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनू भाकर हिचे 'मनू तुझं यश अविश्वसनीय' असे म्हणत तिचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'ऐतिहासिक पदक! खूप छान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पहिले पदक जिंकले. कांस्यपदकासाठी तुझे अभिनंदन. हे यश आणखी खास आहे, कारण ती भारतासाठी नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे. हे यश अविश्वसनीय यश असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
बातमी शेअर करा