बीड दि.२८ (प्रतिनिधी)- सध्या पाऊस पडत असल्याने या पावसाने बसस्थानकात नुसता चिखल जमा झाला. हा खिचल तुडवत प्रवाशांना ये जा करावी लागत आहे. सध्या बस स्थानकाचे काम सुरू असले तरी हे काम अत्यंत संथ गतीने सुरु असल्याने लवकर काम होत नसल्याचे दिसत आहेत. बीड बसस्थानकाची दैना कधी फिटेल असा प्रश्न उपस्थित होत आहे लवकरात लवकर नवीन बसस्थानकाचे काम पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.
गेल्या अनेक वर्षापासुन बीड बसस्थानकाची दुरावस्था आहे. बसस्थानकाच्या समोरील भागात नुसता चिखल होतो. जास्त पाऊस झाल्यानंतर या ठिकाणी पाणी जमा होते. काही महिन्यापासुन नवीन बसस्थानकाचे काम सुरू झाले आहे. हे काम कधी पुर्ण होईल हे सांगता होत नाही. सध्या प्रवाशांची गैर सोय होवू लागली. बसस्थानकात नुसता चिखल असल्याने या चिखलातच ये जा करावी लागत आहे.याच चिखलात उभे राहून बसची वाट पाहत थांबण्याची वेळ,बसस्थानक प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी केली जात आहे.