Advertisement

मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणावर संसदेत चर्चा

प्रजापत्र | Wednesday, 24/07/2024
बातमी शेअर करा

सोलापूर- सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडताना मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे महिला आरक्षण लागू करण्याची मागणीही संसदेच्या शुन्य प्रहारावेळी पीठासीन अधिकारी संध्या राय यांच्यासमोर केली.

 

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गांयांना आरक्षण मिळवून दिले. पण केंद्र सरकार खासगीकरण करून आरक्षण संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज, धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. त्यामुळे राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. राज्याच्या सर्वच जिल्ह्यात आरक्षणासाठी आंदोलने, मोर्चेा, धरणे, उपोषण सुरू आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे, म्हणून लवकरात लवकर मराठा समाज व धनगर समाजाला आरक्षण मिळावे अशी विनंती लोसकभेत केली. तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातनिहाय गणना करण्याची मागणी केली आहे, तीही करावी अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली.

Advertisement

Advertisement