बीड-कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन शिथिल होऊ लागल्यानंतर लालपरीला निम्म्या क्षमतेने रस्त्यावर धावण्याची परवानगी दिली गेली मात्र बीड-गेवराई मार्गावर शारीरिक अंतराचे सारे नियम धाब्यावर बसवित एसटी केवळ पूर्ण क्षमतेनेच नव्हे तर प्रवाशी उभे करुन खचाखच भरलेल्या अवस्थेत धावत असल्याचे चित्र बुधवारी पहायला मिळाले.
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने २३ मे पासून बससेवा जिल्हांतर्गत सुरु करण्यात आली.यावेळी बसमध्ये केवळ ५० टक्के प्रवाशी मर्यादा राहतील असे आदेश देण्यात आले होते.मात्र बुधवारी (दि.१७) गेवराई आगारातून साडेचारच्या सुमारास तब्ब्ल ५३ प्रवासी खच्चून भरत बस बीडकडे आणण्यात आली.यावेळी एम.डी गायके हे वाहक म्हणून होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडूनच जर नियम धाब्यावर बसविण्यात येणार असेल तर प्रवाश्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार? हा प्रश्न आता या घटनेतून समोर येऊ लागलाय.