Advertisement

माजी अग्निविरांसाठी 'या' विभागात १० टक्के जागा राखीव

प्रजापत्र | Wednesday, 24/07/2024
बातमी शेअर करा

दिल्ली- केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्स मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) आणि रायफलमन या पदांची भरती करताना माजी अग्निवीरांसाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याशिवाय, वयोमर्यादेत शिथिलता आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणीतून सूट देण्याची तरतूद करण्यात आली आहे. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी (दि. २४) राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

         केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्स मध्ये १ जुलै रोजी रिक्त पदांची संख्या १० लाख ४५ हजार ७५१ या एकूण मंजूर संख्येच्या तुलनेत ८४ हजार १०६ आहे. एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ दरम्यान ६७ हजार ३४५ उमेदवारांची भरती करण्यात आली. ६४ हजार ९१ रिक्त पदे अधिसूचित करण्यात आली असून ती भरतीच्या विविध टप्प्यात आहेत, असेही गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत सांगितले.

Advertisement

Advertisement