Advertisement

तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले

प्रजापत्र | Monday, 22/07/2024
बातमी शेअर करा

पिंपरी- प्रेमसंबंधातून गरोदर राहिलेल्या विवाहितेचा गर्भपातादरम्यान मृत्यु झाला. तिचा मृतदेह नदीत फेकून दिला. त्यानंतर आरडाओरडा करणाऱ्या तिच्या दोन मुलांनाही जिवंतपणे नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मावळ तालुक्यातील या तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे.   

 

 

मावळ तालुक्यातील २५ वर्षीय विवाहित महिलेसह तिचा पाच वर्षीय मुलगा आणि दोन वर्षीय मुलगा यांची हत्या झाली. गजेंद्र जगन्नाथ दगडखैर (३७, रा. समता काॅलनी, वराळे, ता. मावळ), रविकांत भानुदास गायकवाड (४१, रा. सावेडी, ता. जि. अहमदनगर), गर्भपात करण्यासाठी मदत करणारी एजंट महिला, कळंबोली येथील हाॅस्पिटलमधील संबंधित डाॅक्टर व त्यांना मदत करणाऱ्या सर्वांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

 

 

पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यांतर्गत विवाहित महिला समरीन ही बेपत्ता असल्यावरून मिसिंग प्रकरण दाखल केले होते. या चौकशीमध्ये समरीन हिच्या प्रियकराने तिचा गर्भपात करण्याच्या निमित्ताने तिला आपल्या मित्रासोबत ठाणे येथे पाठविले होते. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला. त्यानंतर प्रियकराच्या मित्राने समरीन हिचा मृतदेह व तिच्या दोन्ही मुलांना परत घेऊन आला. तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ९ जुलै २०२४ रोजी पहाटे प्रियकराच्या मदतीने समरीन हिचा मृतदेह इंद्रायणी नदीमध्ये टाकून दिली. हा प्रकार पाहून समरीन हिची दोन्ही मुले आरडाओरडा करून लागली. दोन्ही मुले रडू लागल्यामुळे त्यांना देखील जिवंतपणे नदीमध्ये टाकून दिले. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रियकर गजेंद्र दगडखैर व त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली.

Advertisement

Advertisement