बीड दि.१९ (प्रतिनिधी ) - बेकायदेशीर खरेदीखत करून एकाची एक लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तिघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी कि,केशव दादाराव तांदळे (रा.वंजारवाडी ता.बीड) यांची धनंजय पांडुरंग काकडे, कल्पना धनंजय काकडे (रा.दोघे बोरखेड) व सॉलार पावरचे प्रतिनिधी अमोल रामचंद्र कुंभार (रा.धाराशिव) या तिघांनी बनावट खरेदीखत करून घेवून फसवणुक केली. जमिनीवर बेकायदेशीर मार्गाने अतिक्रमण केले आहे. या बेकायदेशीर खरेदीखतामुळे तांदळे यांची एक लाख रूपयांची फसवणूक झाली. आपली फसवणूक झाल्याने तांदळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या बाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा