Advertisement

 विशाळगड हिंसाचाराच्या निषेधार्थ मुस्लिम समाज रस्त्यावर 

प्रजापत्र | Friday, 19/07/2024
बातमी शेअर करा

 बीड दि.१९ (प्रतिनिधी)- सरकार आणि प्रशासन मुर्दाबाद अशा घोषणा देत मुस्लीम समाज बांधव आज दुपारी प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरले होते. हातात तिरंगा ध्वज आणि निषेधासाठी काळे झेंडे, डोक्याला काळ्या प‌ट्ट्या बांधून रस्त्यावर उत्तरलेल्या समाज बांधवांनी कोल्हापुर जिल्ह्यातील विशाळगड गाजापुर येथील हिंसाचाराचा निषेध नोंदवला. 

             

           मुस्लीम समाजाच्या धार्मिक स्थळांसह मुस्लीम घरांना टार्गेट करणाऱ्या समाजकटक हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करा, त्यांच्याविरुध्द यूएपीए अंतर्गत कारवाई करा आणि मुस्लीमांना संरक्षण द्या अशी एकमुखी मागणी यावेळी संतप्त जमावाकडून करण्यात आली.बीड येथील बशीरगंज चौकात एमआयएमच्या वतीने आज दुपारी विशाळगड-गाजापुर हिंसाचाराच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.जिल्हाध्यक्ष अॅड शेख शफीकभाऊ  यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शन प्रसंगी मुस्लीम समाज बांधव प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सीए बी.बी जाधव, पत्रकार भागवत तावरे, शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने धनंजय गुंदेकर, दलीत पँथरचे नितीन सोनवणे यांनी उपस्थित राहून पाठींबा दर्शविला. पोलीस प्रशासनाच्या बतीने बशीरगंज चौक परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

Advertisement

Advertisement