Advertisement

शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा

प्रजापत्र | Friday, 19/07/2024
बातमी शेअर करा

पक्षात पडलेल्या फुटीनंतर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह दिले होते. तर शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवावी लागली होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासह ८ खासदार निवडून आणण्यात शरद पवार यशस्वी ठरले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडांवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगानं शरद पवार गटाचं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कायम ठेवलं आहे. तर पिपाणी हे चिन्ह गोठवलं आहे. 

 

 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासह लढणाऱ्या उमेदवारांविरोधात काही उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह मिळालं होतं. दोन्ही चिन्हांमध्ये बऱ्यापैकी साम्य असल्याने काही ठिकाणी त्याचा फटका शरद पवार गटाला बसला होता. त्यामुळे पिपाणी चिन्हाविरोधात शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावर निर्णय देताना निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह गोठवलं आहे. त्याबरोबरच केवळ तुतारी हे चिन्ह गोठवण्याचा निर्णयही निवडणूक आयोगानं घेतला आहे. 

 

 

Advertisement

Advertisement