मुंबई- विशाळगडावरील हिंसक घटनांच्या प्रकरणावर आज हायकोर्टात तातडीची सुनावणी सुरु आहे. विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी स्थानिक प्रशासनानं हाती घेतलेली मोहीम तसेच विशाळगड अतिक्रमणांपासून वाचवण्यासाठी उजव्या विचारसणीच्या संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनेचं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं होतं. कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांना विशाळगडावरील बांधकामं पाडण्यापासून मज्जाव करण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवर हायकोर्टात न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. हायकोर्टानं युक्तिवाद ऐकून घेत मान्सून काळातील कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. सप्टेंबर महिन्यापर्यंत कुठलीही नवी तोडक कारवाई नको, असं हायकोर्टानं म्हटलं आहे.

बातमी शेअर करा