Advertisement

आगामी विधानसभा निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी अशी होणार

प्रजापत्र | Wednesday, 17/07/2024
बातमी शेअर करा

 सांगली- येणारी विधानसभा निवडणूक ही ओबीसी विरुद्ध मराठा अशीच होणार आहे, त्यात ओबीसी नेते आणि कार्यकर्ते जिंकल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी सांगलीमध्ये ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ते बोलत होते. 

 

 

प्रकाश शेंडगे म्हणाले की, आता जी राजकीय चळवळ उभी राहणार आहे त्यातून नवे नेतृत्व समोर येणार आहे.  प्रत्येकजण म्हणतोय मी लढणार. आतापर्यंत कुणीच लढायला तयार नव्हतं. या वातावरणात प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून १०-१५ ओबीसी नेते तयार होणार आहेत. त्यामुळे आगामी राजकीय लढा जो आहे तो ओबीसी विरूद्ध मराठा असाच होणार आहे. हा लढा ओबीसीचे नेते आणि कार्यकर्ते जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. 

 

आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी सांगलीमध्ये ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांगलीमध्ये लवकरच ओबीसींचा मोठा मेळावा घेण्यात येईल आणि या मेळाव्यात पुढील भूमिका ठरविण्यात येईल असं प्रकाश शेंडगे म्हणाले.

Advertisement

Advertisement