Advertisement

 'लाडकी बहिण'साठी पैसे उकळणाऱ्या महिलेवर गुन्हा 

प्रजापत्र | Wednesday, 17/07/2024
बातमी शेअर करा

संभाजीनगर -  शासनानं महिलांसाठी सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी गरीब महिलांकडून पैसे उकळणाऱ्या एका महिल एजंटवर पहिला गुन्हा दाखल झाला आहे. अशा प्रकारे पैसे घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे, निर्देश नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. छत्रपती संभाजीनगर इथं हा प्रकार घडला आहे.

 

 लाडकी बहीण योजनेच्या मंजुरीसाठी दलाली करणाऱ्या एका महिलेवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिकाऱ्यांच्या नावे पैसे घेणाऱ्यावर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. त्यानुसार लाडकी बहीण योजनेसाठी बहिणींची आर्थिक लूट केल्यावरून हा राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

 

वंदना म्हस्के ही गरीब महिलांना लुटत असल्याची तक्रार काही महिलांनी तहसीलदारसमोर केली होती, त्यानंतर या महिलांचे जबाब नोंदवून घेत तहसिलदारांनी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. अनुदान मंजूर करण्यासाठी, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी वंदना मस्के ही गोरगरीब महिलाकडून पैसे उकळत होती. पैसे देऊन देखील अनुदान खात्यावर जमा होईना म्हणून महिलांनी म्हस्के यांच्याकडं विचारणा केली असता ही महिला धमक्या देत असल्यानं महिलांनी तहसीलदारांकडं धाव घेतली होती.

Advertisement

Advertisement