बीड दि.१३ (प्रतिनिधी)-दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला गुटखा का आयशर टेम्पोमध्ये नसून थेट कंटेनर भरून असल्याचे कळते.दिंद्रुड पोलिसांनी पकडलेला गुटखा हा आयशर टेम्पोमध्ये असल्याचे सुरुवातीला प्रजापत्रशी बोलताना सांगितले होते.मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर गुटखा टेम्पोत नसून थेट कंटेनरभरून असल्याचे कळते.
राजनिवास नावाचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख व पोलिसांनी आज ताब्यात घेतला आहे.सदरचा गुटखा कर्नाटक राज्यातून उमरगा,नळदुर्ग सीमा ओलांडून आल्याची माहिती आहे.दोन जिल्ह्यापेक्षा अधिकची हद्द आणि एका राज्याची सीमा ओलांडल्यानंतर ही वाहतूक सुरक्षा पोलीस असतील किंवा स्थानिक पोलीस यांना एवढा मोठा कंटेनर कसा दिसला नाही? याबाबत आता प्रश्न उपस्थितीत होत आहेत.आजच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे जिल्हयातील गुटख्याची तस्करी आणि विक्रीबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.सध्या दिंद्रुड पोलीस ठाण्यात हा कंटेनर लावण्यात आल्याचे कळते.पोलीस मुद्देमालाची मोजणी करत असून सदर माल १ कोटींच्या ही पुढे असल्याचे सांगितले जात आहे.