Advertisement

पसार झालेल्या इरण्णावर अखेर निलंबनाची कारवाई

प्रजापत्र | Saturday, 13/07/2024
बातमी शेअर करा

 लातूर - ‘नीट’ प्रकरणी लातुरात गुन्हा दाखल झाल्यापासून इरण्णा मष्णाजी काेनगलवार हा तपास यंत्रणांना गुंगारा देत पसार आहे. अद्यापि त्याचा सुगावा लागला नाही. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश उमरगा येथील औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रभारी प्राचार्य एस.व्ही. माळकुंजे यांनी निर्गमित केले आहेत.

 

 

‘नीट’मध्ये गुणवाढीचे आमिष दाखवून विद्यार्थी-पालकांची फसवणूक केल्याप्रकरणी लातुरात शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात नांदेड एटीएसने दिलेल्या तक्रारीवरुन चाैघांविराेधात गुन्हा दाखल केला हाेता. दरम्यान, यातील दाेन शिक्षकांना पाेलिसांनी अटक केली. तर म्हाेरक्या गंगाधर याला आंध्र प्रदेशातून सीबीआयने अटक केली. सध्या ताे लातुरात सीबीआय काेठडीत असून, त्याची कसून चाैकशी सुरु आहे. आतापर्यंत या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली. मात्र, इरण्णा काेनगलवार (रा. नाटकर गल्ली, देगलूर, जि. नांदेड) हा सीबीआयलाही गुंगारा देत पसार आहे.
 

Advertisement

Advertisement