Advertisement

कुंडलीक खांडेंची जामीन फेटाळली

प्रजापत्र | Friday, 12/07/2024
बातमी शेअर करा

बीड :शिवसेना उपजिल्हाप्रुखावरील प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपी, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे यांचा जामीन अर्ज बीडच्या जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. न्या. के. आर. जोगळेकर यांनी हा निर्णय दिला. 
शिवसेनेचे उपजिल्हाप्रुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडेकर इतरांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात तब्बल तीन महिन्यानंतर पोलीसांनी कुंडलीक खांडे याला अटक केले होते. ६ दिवसाच्या पोलीस कोठडी नंतर मागील आठवड्यात कुंडलीक खांडे ला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर खांडे यांनी जामिनासाठी बीडच्या जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्या जामीन अर्जावर न्या. के. आर. जोगळेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारपक्षासह मुळ फिर्यादीचे वकील मंगेश पोकळे यांनी या जामिनाला जोरदार विरोध केला होता. दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने या प्रकरणात निकाल राखून ठेवला होता. शुक्रवारी न्यायालयाने हा जामीन फेटाळण्याचा निर्णय दिला. कुंडलीक खांडे साठी हा मोठा धक्का मानला जात आहे
.

Advertisement

Advertisement