Advertisement

विधानसभा निवडणूकीपूर्वी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करु

प्रजापत्र | Friday, 12/07/2024
बातमी शेअर करा

 महाराष्ट्र राज्याच्या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यांच्यासाठी लवकरच स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करु असे आश्वासन शिंदे यांनी केले. यावेळी ठाण्याचे आमदार संजय केळकर हे देखील उपस्थित होते.

राज्यामध्ये अडीच लाखांच्या घरात असणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राज्य सरकारने स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, अशी मागणी केळकरांनी विधानसभेमध्ये उपस्थित केली होती. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने विधानभवनामध्ये मुख्यमंत्री शिंदे व आमदार केळकर यांचा सत्कार करण्यात आला. विधानसभेत केलेल्या घोषणेप्रमाणे हे कल्याणकारी मंडळ लवकर कार्यान्वीत करावे अशी मागणी संघटने वतीने करण्यात आली.

संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनिल पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, व्यवस्थापन समिती सदस्य दत्तात्रय घाडगे, संजय पावसे, गोपाळ चौधरी यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली.

"महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना ही राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची एकमेव शिखर संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे वृत्तपत्रे विक्री यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ करावे अशी मागणी करण्यात येत आहे. मी अधिवेशनात याबाबत घोषणा केली आहे तरी आपण केलेल्या घोषणेची पुर्तता करावी. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करावे".

 

 

- आमदार संजय केळकर

"आपण अनेक दिवस मागणी करत आहात तर केळकरांनी देखील अनेकदा हा प्रश्न विधानसभेत मांडला आहे. लवकरच विधानसभा निवडणूकीपूर्वी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करु".

Advertisement

Advertisement