दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कथित मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे. पण सध्या केजरीवाल हे सीबीआयच्या कोठडीत असल्याने केजरीवाल यांचा जेलच्या बाहेर येण्याचा मार्ग खडतर आहे.
सविस्तर माहिती अशी की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे. पण त्यांना तुरुंगातून बाहेर येण्याची वाट बिकट आहे. कारण हा जामीन त्यांना ईडीच्या प्रकरणात मिळाला आहे आणि ते सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांचा मुक्काम जेलमध्येच असण्याची शक्यता आहे.केजरीवाल यांना सीबीआयने २६ जून रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात अटक केली होती. त्यामुळे याप्रकरणाचा खटला अद्याप प्रलंबित आहे. या प्रकरणी १८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यानंतरच अरविंद केजरीवाल बाहेर येणार की जेलमध्येच राहणार? याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.