Advertisement

 विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात नवीन समीकरण

प्रजापत्र | Tuesday, 09/07/2024
बातमी शेअर करा

   राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. मागच्या पाच वर्षांमध्ये दोन पक्षांचे चार पक्ष झाले असून भाजपलादेखील म्हणावा तसा आत्मविश्वास उरला नसल्याचं दिसून येतंय. त्यातच आता एक नवीनच समीकरण राज्याच्या राजकारणात पुढे येताना दिसून येत आहे.

 

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची सूत्रंची माहिती आहे. उभय नेत्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुका एकत्रित लढवण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय.पुणे इथं आयोजित करण्यात आलेल्या स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख पाहुणे बच्चू कडू होते. पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यात निवडणुकीच्या संबंधाने चर्चा झाली. राज्यभरातील घटक पक्षांना एकत्रित करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती.

 

तसे झाले तर स्वराज्य पक्ष, प्रहार संघटना आणि राज्यातील अनेक छोटे-मोठे घटकपक्ष मिळून एक नवीन समीकरण पुढे येऊ शकते. त्याचा परिणाम विद्यमान सरकार आणि विरोधी महाविकास आघाडीवर होणार का? हे पाहाणं महत्त्वाचं आहे. मुळात हे नवीन समीकरण अस्तित्वात येतं की नाही, हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे.

Advertisement

Advertisement