बीड- तालुक्यातील बोरखेड येथील तरूणाचा मृतदेह लिंबागणेशपासून जवळच असलेल्या महाजनवाडी फॉरेस्ट लगतच्या शिवरस्त्याच्या कडेला काल आढळून आला होता. पैशाच्या वादातून त्या मजुराचा खून करण्यात आला. यातील तीनही आरोपीना अखेर स्थानिक गुन्हे शाखा व नेकनूर पोलिसांनी २४ तासाच्या आत ताब्यात घेतले आहे.
शिवाजी पवार,बाबू फुलचंद काळे,उमेश शिवाजी पवार या तीन आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने साकत (ता. जामखेड. जि. अहमदनगर) मधून अटक केली आहे. शिवाजी पवारला कालच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर आज उमेश आणि बाबूला ताब्यात घेण्यात आल्याचे कळते.इस्माईल सत्तार तांबोळी (वय ३२, रा.बोरखेड, ता. बीड) या ऊसतोड कामगाराची पैशाच्या वादातून हत्या करण्यात आली होती. देवाण-घेवाणीतून झालेल्या वादात वरील तिघांनी इस्माईलची हत्या केली होती. पोलीस तपासातून ही बाब समोर आल्यानंतर तीन ही आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नसीर शेख,राजू पठाण,अतुल हराळे यांनी ताब्यात घेतले.सध्या तीन ही आरोपीना नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा