Advertisement

जयंत पाटलांचा 'हा' पॅटर्न राज्यात राबविणार

प्रजापत्र | Sunday, 07/07/2024
बातमी शेअर करा

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री असताना जयंत पाटील यांनी जिल्हा परिषद शाळांचा व आरोग्य व्यवस्थांचा दर्जा वाढावा यासाठी सांगली जिल्ह्यात ‘माझी शाळा आदर्श शाळा’ व ‘स्मार्ट पीएचसी’ हे उपक्रम सुरू केले. हे उपक्रम अतिशय यशस्वी ठरले असल्याने ते संपूर्ण राज्यभर राबवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.

 

 

महाविकास आघाडीच्या काळात जयंत पाटील यांच्याकडे सांगलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. त्या काळात त्यांनी जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक व भौगोलिक दर्जा सुधारण्यासाठी तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्यासाठी उपक्रम राबविले. या उपक्रमांतर्गत शाळेत डिजिटल क्लास रूम, प्रशिक्षित शिक्षक, प्ले ग्राऊंड, चांगल्या दर्जाचे स्वच्छतागृह आदींचा समावेश केला होता. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरक औषधांचा साठा, सुसज्ज यंत्र तसेच रिक्त जागी नोकर भरती करत आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवला.

 

 

या उपक्रमास जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात आला. तसेच शाळेसाठी ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांना एकत्रित करुन विशेष निधी उभारला. सद्यस्थितीला ५५० पेक्षा अधिक शाळांची सुधारणा प्रगतीपथावर असून ६५ प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी स्मार्ट पीएचसी उपक्रमाची सुरुवात झाली आहे. हा उपक्रमही आता राज्यात राबवला जाणार आहे.

Advertisement

Advertisement