Advertisement

बाईकवर रिल काढण्याच्या नादात भीषण अपघात

प्रजापत्र | Saturday, 06/07/2024
बातमी शेअर करा

 बीड : सध्या सेल्फिचा ट्रेण्ड आहे.एखादे निसर्गरम्य ठिकाण असो अथवा  सेलिब्रिटी व्यक्तीची भेट, अगदी रोजच्या आयुष्यात सेल्फीचा मोह अनेकांना सूटत नाही. कधी कधी हाच मोह जीवावर बेतण्याच्या घटना ही घडत असतात. बीडमध्ये अशीच घटना घडली असून यात अनिरुद्ध कळकांबे या तरुणाचा मृत्यु झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीवर मागे बसलेला तरुण सेल्फी कॅमेऱ्याच्या माध्यमातून रिल काढत होता. यावेळी गाडी चालविणारा तरुणही रीलमध्ये व्यस्त असल्याने बीड बायपासवरील राष्ट्रीय महामार्गांवर अपघाताची घटना घडली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात अनिरुद्धचा जागीच मृत्यु झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. दोघे जालना जिल्ह्यातील रहिवाशी होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येतं आहे. 

Advertisement

Advertisement