मुंबई- वसंत मोरे हे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहेत. वसंत मोरे यांनी आज उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. वसंत मोरे ९ जुलैला ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. वसंत मोरे वंचितचा साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. वसंत मोरे खडकवासला किंवा हडपसर मतदारसंघातून विधानसभा लढवणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले, आज पक्षप्रमुखांची भेट घेतली. ९ जुलै रोजी माझा मातोश्रीवर पक्षप्रवेश पार पडणार आहे. सर्व प्राथमिक चर्चा या भेटीत पार पडल्या. त्यांनी ९ तारीख दिली आहे. त्या दिवशी मी माझ्या समर्थकांसह पक्षप्रवेश करणार आहे. विधानसभा निवडणुकीबाबत ते म्हणाले, पक्षप्रवेश तर होत आहे, बाकी बाबी पक्षप्रमुख ठरवतील. पण मी परत एकदा स्वगृही परत आलो आहे.
तर वंचित सोडण्यावर मोरे म्हणाले, मी वंचितमध्ये गेलो. वंतिच मतदारांनी मला स्वीकारलं नाही. त्यामुळं मी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहे.ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना यांसदर्भात माहिती देताना सांगितलं की, वसंत मोरे ठाकरे गटामध्ये प्रवेश करतील. वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती.