Advertisement

काय करायचे ते करा म्हणणाऱ्या अंबादास दानवेंनी दिलगिरीचे पत्र दिले

प्रजापत्र | Wednesday, 03/07/2024
बातमी शेअर करा

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दोन दिवसापूर्वी विधान परिषदेत भाजपा आमदार प्रसाद लाड आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. लोकसभेतील राहुल गांधी यांच्या भाषणावरुन आमदार लाड यांनी विरोधकांना घेरलं. यावेळी जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते, यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्याचे समोर आले. यानंतर दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले होते. दरम्यान, आता अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभापतींना पत्र लिहून दिलगीरी व्यक्त केली आहे. 

विरोधी पक्षनेचे अंबादास दानवे यांनी पत्र लिहून शिवीगाळ प्रकरणी दिलगीरी व्यक्त केली आहे. यामुळे आता अंबादास दानवे यांचे निलंबन पाठिमागे घेतले जाऊ शकते. आज दुपारी या निलंबनावर निर्णय हेऊ शकतो. 

सभापतींना दिले पत्र

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभापतींना पत्र दिले आहे. या पत्रा म्हणाले की, मी सभागृहाचा सदस्य म्हणून आतापर्यंत सातत्याने सभागृहाचे पावित्र्य, नियम, प्रथा आणि परंपरा पाळण्याता आटोकाट प्रयत्न केला आहे. परंतु दि.१ जुलै २०२४ रोजी माझ्याकडून अनावधानाने घडलेल्या घटनेनंतर आपण मला निलंबित केले. सभापती महोदया, या संदर्भात आमच्या पक्षप्रमुखांनी जाहिरपणे दिलगीरी व्यक्त केली आहे, हे आपण जाणताच आणि माझीही भूमिका सभागृहाचे पावित्र्य  कायम रहावे हीच आहे, त्यामुळे सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझ्या मनात कोणतेही किंतु परंतु नाही, असंही या पत्रात म्हटले आहे. 

सभागृहाचे कामकाज सुरू आहे, या स्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता-भगिणीचे अनेक प्रश्न मला सभागृहात मांडायचे आहेत. जेणेकरुन सरकार त्या प्रश्नाला न्याय देईल, त्यामुळे माझे निलंबन म्हणजे शेतकरी, कष्टकरी, तरुण व माता भगिणींचे प्रश्न सोडवण्यापासून मला थांबविणे असे होऊ नये, या हेतूने माझ्या निलंबनाचा फेरविचार करावा, ही विनंती, असंही पत्रात म्हटले आहे.

 

 

अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे, विधान परिषदेत आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. 

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसदेत केलेल्या भाषणाचा मुद्दा सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेत मांडला. या मुद्द्यावरुन सभागृहात जोरदार वाद सुरू झाला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेचे अंबादास दानवे यांचा तोल सुटला आणि त्यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर सभागृहात जोरदार गोंधळ सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.  

Advertisement

Advertisement