Advertisement

लाडकी बहिण योजनेत महत्वाचे सात मोठे बदल

प्रजापत्र | Tuesday, 02/07/2024
बातमी शेअर करा

अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नोंदणीला 1 जुलैपासून सुरुवात झाली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांनी प्रचंड गर्दी केली. यातील अटीशर्थीवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना काही नियम शिथिल झाल्याचं सांगितलं. वयाची मर्यादा वाढ करण्यात आली आहे, त्याशिवाय उत्पन्नाची अटही शिथिल करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेतंर्गत महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच, यासाठी पात्र अपात्रतेचे निकष लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री माझी लालकी बहीण योजनेत सात बदल कऱण्यात आले आहेत. पाहूयात काय बदल करण्यात आले आहे... 1. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.1जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.01जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. २. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे 1. रेशन कार्ड 2. मतदार ओळखपत्र 3. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 4. जन्म दाखला. या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत. ३. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. ४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे. ५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1. जन्म दाखला 2. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 3. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.

 

 

६. रु.2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.

 

७. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement