Advertisement

एकनाथ शिंदेंनी विधानसभेत नवा अन् जुना शालेय गणवेश दाखवला  

प्रजापत्र | Tuesday, 02/07/2024
बातमी शेअर करा

  शालेय गणवेशाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदेंनी विधानसभेत जुना आणि नवीन शालेय गणवेश सर्वांसमोर सादर केला. दोन्ही गणवेश दाखवत नव्या गणवेशाची क्वालिटी बघा, असं एकनाथ शिंदे म्हणाले.  तसेच लहान मुलं आहेत, त्यांचा गणवेश, त्यांचा पोषण आहार यामध्ये कोणतीही तडजोड करायची नाही. गणवेश आणि पोषण आहाराबाबत कोणी कॉप्रोमाईज करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करा. हे पुण्ण्याचे काम आहे. जो यामध्ये भ्रष्टाचार करेल. त्याच्यावर कारवाई करणार असल्याचा इशाराही एकनाथ शिंदेंनी दिला. 

Advertisement

Advertisement