Advertisement

जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

प्रजापत्र | Sunday, 30/06/2024
बातमी शेअर करा

बीड दि.३० (प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस दलात बदल्यांचे सत्र सुरु झालेले असून बीड जिल्ह्यातून चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. विलास हिरामण पाटील,संतोष एकनाथ खेतमाळस यांची विनंतीवरून तर कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे हरिभाऊ नारायण खाडे,सुरेश सुधाकर चाटे यांची बदली करण्यात आली आहे. 
   बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर कालावधी पूर्ण झालेले अधिकारी आणि काही विनंती बदल्यावरून पोलीस दलात बदल्यांचे सत्र सुरु झालेले आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक,पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या सुरु असून रविवारी राज्यातील ३७९ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.यात बीड जिल्ह्यातून  विलास हिरामण पाटील,संतोष एकनाथ खेतमाळस,हरिभाऊ नारायण खाडे,सुरेश सुधाकर चाटे यांची बदली झाली आहे.तर राजेंद्र हरिभाऊ बहिरट सोलापूर शहरवरून तर सोमनाथ मधुकर जाधव यवतमाळवरून बीडला येत आहेत.  

 

सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षकांच्याही बदल्या 
जिल्ह्यातून पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर विनंती आणि कार्यकाळ पूर्ण झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षकांच्याही बदल्या झाल्या आहेत.सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये राहुल एकनाथ आघाव,बाळासाहेब गंगाराम आघाव,अविनाश अशोक राठोड,संतोष गुलाब मिसळे,धरणीधर बाब कोळेकर,नीता खंडूजी गायकवाड,घनशाम लालेश्वर अंतरप,भास्कर देवराव नवले,आनंद शिवाजी कांगुणे या ९ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.तर छत्रपती संभाजीनगरवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम धर्मराज सिरसाट बीडला येत आहेत.तसेच पोलीस उपनिरीक्षकांमध्ये राजधर मुरलीधर पठाडे,अनघा अंकुश गोडगे, विजय सुधाकर थोटे,अर्चना दिलीप भोसले,ज्ञानेश्वर दशरथ गव्हाणे,बाबासाहेब रामभाऊ खरात,सचिन सुखदेव दाभाडे यांच्या जिल्ह्यातून बदल्या झाल्या असून छत्रपती संभाजी नगर ग्रामीण वरून स्वप्नील लक्ष्मण भोजगुडे तर धाराशिववरुन तुकाराम रघूनाथ बोडखे बीडला येत आहेत.पोलीस उपनिरीक्षकांमध्ये मीना भिवसन तुपे यांना मात्र एक वर्ष मुदतवाढ मिळाली आहे.

 

Advertisement

Advertisement