Advertisement

पीकविम्यासाठी १ रुपयापेक्षा जास्त पैसे मागितल्यास होणार कारवाई

प्रजापत्र | Saturday, 29/06/2024
बातमी शेअर करा

मुंबई- पीकविम्या संदर्भात अधिकची रक्कम घेतली जात असल्याचं समोर आलं आहे. यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीकविमा भरण्याची योजना सुरू केलेली आहे. मात्र सध्या खरीप हंगामाचा विमा भरताना काही सी एस सी केंद्र चालक शेतकऱ्यांकडून आगाऊ रक्कम वसूल करत असल्याचा तक्रारी येत आहेत, असं मुंडे म्हणाले.

 

 

सदर केंद्र चालकांना विमा भरून घेण्यासाठीचे मानधन शासन नियमित देते. त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना विनंती आहे की विमा भरताना एक रुपयाच्या वर आगाऊ रक्कम देऊ नये. केंद्र चालकाने आगाऊ रकमेची मागणी केल्यास शक्य त्या पुराव्यासह कृषी हेल्प लाईनच्या ९८२२६६४४५५ या क्रमांकावर व्हाट्सप द्वारे थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार द्यावी, असं मुंडे यांनी सांगितलं आहे.

 

सदर केंद्र चालकावर ग्रामविकास विभागाच्या मदतीने कडक कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

Advertisement

Advertisement