राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी,महिलांसाठी विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये एक महत्वाची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे थकीत वीज बील माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलं आहे.
राज्यातील ४४ लाखाहून अधिक कृषी पंपधारक शेतकऱ्यांना फायदा होणार
महाराष्ट्र विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामधील महत्वाची घोषणा म्हणजे सरकारनं शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा राज्यातील ४४ लाखाहून अधिक कृषी पंपधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.