Advertisement

शिरूमधील १२ दुकाने आगीत भस्मसात 

प्रजापत्र | Friday, 28/06/2024
बातमी शेअर करा

  शिरूर- शहरातील जिजामाता चौकात गुरूवारी मध्यरात्री १२ वाजता  १० ते १२ दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत १० ते १२ दुकानांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.   

 

सविस्तर माहिती अशी कि, शहरातील जिजामाता चौकात गुरूवारी मध्यरात्री १२ वाजता  १० ते १२ दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत दुकानांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.  दरम्यान, या दुकानांना आग का लावली हे अद्याप समजलं नव्हते. सुरुवातीला कोणी अज्ञातांनी दुकानाला आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, ही आग  शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती दुकानदारांनी दिली आहे. 

 

अग्निशमन बंब
असते तर..
शिरुरकासार येथे नगरपंचायत आहे. हे तालुक्याचे ठिकाण असूनही येथे अग्निशमन बंबची व्यवस्था नाही.त्यामुळे अशी काही घटना घडली की, बाहेरुन
अग्निशमन बंबला पाचारण करण्यात येते. जर येथील नगरपंचायतीकडे अग्निशमन बंब असते तर नुकसान टळले असते अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे . 

 

Advertisement

Advertisement