चकलांबा प्रतिनिधी:- गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात दुपारपासूनच विजांचा कडकडात सुरू झाला होता मात्र यामध्ये चकलांबा येथील सायंकाळी साडेपाच सुमारास वीस पडून तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.
गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात वीज पडल्याने शालनबाई शेषराव नजन वय ६५ यांची सुन लंका हरिभाऊ नजन वय ४० तर विजु बाई बाळासाहेब खेडकर वय ४१ असा या वीज पडून मयत झालेल्या महिलांचं नाव आहे. या तिन्ही महिला शेतात काम करत असताना आज सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचा जागेवरच वीज पडून मृत्यु झाला तिन्ही महिला चकलांबा येथील रहिवासी असून त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्या असता त्यांना जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केला आहे. यामध्ये यमुना माणिक खेडकर वय वर्ष ६५ या गंभीर जखमी असून त्यांच्यावर पुढील इलाज आणि उपचार सुरू आहेत

बातमी शेअर करा