Advertisement

चौसाळा येथील कृषी केंद्राचा परवाना निलंबित

प्रजापत्र | Saturday, 22/06/2024
बातमी शेअर करा

बीड -  तालुक्यातील अमोल कृषी सेवा केंद्राचा परवाना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी १९ जून रोजी निलंबित केला आहे. खत नियंत्रण आदेशातील तरतुदीचा व परवान्यातील अटी व शर्थीचा भंग केल्याचे दिसून आल्याने ही कारवाई करण्यात आली. 

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी चौसाळा आणि लगतच्या भागातील खत, बियाणे विकणाऱ्या कृषी दुकानांची तपासणी बुधवारी दुपारी केली होती. योग्य दराने खत व बियाण्यांची विक्री होत आहे की नाही, याची पडताळणी केली. दरम्यान, अमोल कृषी सेवा केंद्राची तपासणी केली असता खताचा साठा, भाव फलक व साठा बुक यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून आली. तसेच दुकानाची सर्व तपासणी केली असता, युरिया खताचा मशीनवरील साठा व प्रत्यक्ष साठा याच्यात मोठा फरक दिसून आला आढळून आला. 