Advertisement

पंकजा मुंडे राज्यसभेवर?

प्रजापत्र | Friday, 21/06/2024
बातमी शेअर करा

मुंबई-लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातून निसटत्या पराभवास सामोरं जावं लागलेल्या पंकजा मुंडे यांची आता राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाकडून पंकजा मुंडे यांचं नाव राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठवलं गेल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

एवढंच नाहीतर उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लावली जावी यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही चर्चा केल्याचीही चर्चा आहे.
पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवरा पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. परंतु हा निसटता पराभव पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या सहन झालेला दिसत नाही. कारण, मागील काही दिवसांत पंकजा मुंडे यांच्या पराभवाचे दु:ख सहन न झाल्याने काहींनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलही उचलल्याचं दिसून आलं आहे. पंकजा मुंडे यांनीही वारंवार असं टोकायंच पाऊल उचलू नका असं कळकळीचं आवाहन केलेलं आहे.
काही दिवस अगोदर महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची दिल्लीत गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीस पंकजा मुंडे यांचीही उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा नेमका कशामुळे फटका बसला आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची काय रणनिती असेल, याच्या रोडमॅपवर तेव्हा प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.पंकजा मुंडे ओबीसीच्या नेत्या असून त्यांना राज्यसभेवर घेतल्यास भाजपला मोठा फायदा विभानसभा निवडणुकीत होऊ शकतो अशी माहिती फडणवीस यांनी केंद्राकडे दिल्याचे समोर येतं आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे राज्यसभेवर जाणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Advertisement

Advertisement