गेवराई (प्रतिनिधी) - एका ३५ वर्षीय विवाहीतेने स्वतःच्या शेतात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी राजापुर येथे घडली. पती पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर तिने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. मात्र मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत माहेरकडील नातेवाईकांनी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्रा घेतला होता.
गेवराई तालुक्यातील राजापुरी येथील सुनिता ठकाराम बेडके (वय ३५ रा.राजापुर) हिने आज सकाळी स्वतःच्या शेतात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तलवाडा पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. विवाहीतेच्या आत्महत्येनंतर संतप्त नातेवाईकांनी गर्दी करत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भुमिका घेतली होती.
बातमी शेअर करा