Advertisement

मातेने दिला तीन बाळांना जन्म 

प्रजापत्र | Tuesday, 18/06/2024
बातमी शेअर करा

बीड - येथील जिल्हा रुग्णालयात एका गर्भवती महिलेला डॉक्टरांच्या टीमने तातडीने उपचार मिळून दिले.त्यामुळे बाळांतीण मातेसह दोन नवजात बाळांना एक प्रकारे जीवदान मिळाले.दरम्यान तिसरे बाळ जन्मताच मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

 

सोमवारी (दि.१७) रोजी अतिशय नाजूक अवस्थेत एक रुग्ण महिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दाखल झाली. तिला सर्वप्रथम डॉ. हनुमंत पारखे यांनी धीर देत तिची सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी तिच्या पोटामध्ये तीन बाळ असल्याची माहिती मिळाली. मात्र एक बाळ मृत अवस्थेत असल्याची माहिती झाली. नंतर तात्काळ तिला शस्त्रक्रिया विभागात दाखल करत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांनी व विभागातील टीमने तिच्यावर तातडीची शस्त्रक्रिया केली. या महिलेने तीन मुलांना जन्म दिला; मात्र दोन मुले वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. 

 

 

 

सारिका संभाजी शिंदे (रा.हिवरापहाडी, ता.बीड) असे बाळंतीण महिलेचे नाव आहे. या महिलेला योग्यवेळी उपचार मिळाले, तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.सध्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात बाळंतीण मातेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement