Advertisement

भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग!

प्रजापत्र | Monday, 17/06/2024
बातमी शेअर करा

नवी दिल्ली -  आगामी काळात महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची तर सह प्रभारी म्हणून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका कधी होणार, याबाबत साशंकता असली तरी पक्षाने निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांची नेमणूक केली आहे.

 

 

भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान तर सहप्रभारी म्हणून खासदार बिप्लब देव यांची नियुक्ती केली आहे. तर झारखंडसाठी निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि सहप्रभारी म्हणून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तात्काळ प्रभावाने वरील नियुक्त्या लागू होतील, असे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी म्हटले आहे.

 

 

पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा
दरम्यान, पंजाब आणि प. बंगालमधील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पक्षाने जालंधर पश्चिम मतदारसंघात शीतल अंगुराल यांना संधी दिली आहे. तर प. बंगालमधील रायगंजमध्ये मानस कुमार घोष, राणाघाट दक्षिणमध्ये मनोज कुमार विश्वास, बगदा मतदारसंघात विनयकुमार विश्वास आणि माणिकतला येथून कल्याण चौबे भट्टाचार्य यांना मैदानात उतरविण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement